Wednesday, June 15, 2016

गणपती पुळे ते मुंबई सागरी महामार्गाने - प्रवास वर्णन (A blog post in Marathi)

Dear Readers. I had posted a blog on this topic some days ago. I felt that I should rewrite it (yes, you got it right, re-write and not merely translate) in my mother and also local tongue MARATHI. With some dedicated efforts I have accomplished the task and posting it for readers to enjoy.

I am from Maharashtra but studied in Rajasthan and MP in Hindi (till HSC) and English (thereafter) medium. Never formally studied Marathi in school hence there would be mistakes of may be spellings or मात्र वगैरे and I seek forgiveness from the language and its purists.

मी काही दिवसांपूर्वीच माझ्या कार ने (3 सहप्रवाश्यासह) 4 दिवसांची कोंकण यात्रा पूर्ण केली. कोंकणात जाताना आम्ही पारंपरीक रस्त्याने (नँशनल हायवे 17)गेलो परंतु येताना मात्र आमचा प्रवास आम्ही पूर्ण पणे सागरी महामार्गाने केला.

प्रवासपूव नियोजनासाठी मी (अर्थातच गुगल देवतेच्या मदतीने) बरेच संशोधन केले परंतु त्यात पूर्ण सागरी महामार्गा बद्दल फारच कमी माहीती मिळाली यद्यपी ह्या मार्गाच्या काही भागांची मात्र थोडी फार पण अपूर्ण माहीती मात्र उपलब्घ होती. त्या मुळे ह्या मार्गाने प्रवास करून त्याच्या (महामार्गाच्या) बद्दल सविस्तार माहीती, बाकी प्रवाश्यांसाठी उपयोगी व्हावी ह्या उद्देशाने, माझ्या ब्लाँग (त्यासाठी मराठी शब्द आहे का?) वर टाकण्याचा निश्चय केला.

हा ब्लाँग लेख (Blog Post) लिहीण्या आधीच मी माझे मत सांगतो – कोंकण यात्रे वर जात असाल तर कमीत कमी एक दिशेच्या प्रवास तरी सागरी महामार्गाने करा (दोन्ही कडचा प्रवास सागरी महामार्गाने जमत नसेल तर). तुम्ही खराब वाहातुकी (Bad Traffic) पासून वाचाल (मात्र सागरी महामार्गा काही भागात खराब असू शकतो) आणि सुंदर निसर्ग आणि समुद्र किनार्याची साथ मन प्रफुल्लित ठेवेल. हा रस्ता घेतल्याचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही.

आमच्या परतीच्या प्रवासमार्गाचा नकाशा खाली आहे

ह्या प्रवासा साठी वापरलेले रस्ते, लागलेला वेळ व अंतर हे खालील तक्त्यात दर्शविले आहे

Time - Distance - Road Used Chart
05-Mar-16
Time
Location
Km ex GP
Road Used
1040
Left Ganapati Pule
0
1110
Reached Jaigad Ferry Jetty
20.5
MH SH 4
1130
Landed at Tavsal Jetty
20.5
MH SH 4
1155
Hedavi Dashbhuja Ganesh
31
MH SH 4
1215
Left Hedavi
31
MH SH 4
1250
Reached Vadyashwar Guhagar
54
MH SH 4
1405
Left Guhagar
56
MH SH 4
1435
Reached Dhopave Ferry Jetty
71.6
MH SH 4
Missed ferry, next at 1515
MH SH 4
1525
Reached Dabhol
71.6
MH SH 4
Anjarli via Dapoli
SH 96 / MH SH 4
Anjarli Kelshi (un-numbered road)
un-numbered
1650
Get on to Velas Kelshi road
124
VK road
Got on to Kuccha Road at Panhali Block
Kuccha Road
Reached Sakhari - Better road
un-numbered
1830
Reached Velas
165.2
un-numbered
1830
left Velas
167
un-numbered
1955
Reached Vesavi Jetty
173
un-numbered
2015
Landed at  Bagmandala Jetty
173
un-numbered
2030
Reached Harihareshwer
178
un-numbered
06-Mar-16
Time
Location
Km ex GP
Road Used
1000
Left Harihareshwer
178
un-numbered
Shrivardhan town
Sh 99
1145
Reached Dighi Jetty
227
Srivardhan - Dighi road
1215
Landed at Agardanda Jetty
227
un-numbered
1235
Rajapuri Parking (Murud fort)
235
un-numbered
1515
Left Rajapuri
235
Revdanda Murud road
Revdanda
Revdanda Alibag Road
Alibag
NH 166A
1745
Stopped at Poynad
302
NH 166A
Vadkhal Naka
NH 66
Kasarbahr - Dolghar
Switch to SH 104 / NH 348
to Belapur
NH 348A
Belapur Vashi
Palm Beach road
2057
Reached Home (Colaba)
397
Sion Panvel HW and EF Way
आता हा प्रवास आपण टप्प्या टप्प्या ने बघूया

दिवस एक – 5 मार्च 16

टप्पा Iगणपती पुळे ते गुहागर.
परतीच्या प्रवासाचा पहीला टप्पा, गणपती पुळे ते गुहागर, आम्ही महाराष्ट राज्य राजमार्ग 4 (ज्याला सागरी महामार्ग असे पण म्हणतात). हा रस्ता अती आल्हादित करणारा खरा किनारी रस्ता आहे आणि समुद्र पूर्ण प्रवासात आपल्या बरोबर रहातो.

ह्या टप्प्यात थोड भागा वगळता रस्ता छानच आहे. परंतू जेट्टींच्या (Jetties) नजीकचा 4 ते 5 कि.मी रस्ता जयगढ आणि तवसाल, दोन्हीकडे, अरुंद व खराब आहे. तिथल्या फेरीचे वेळापत्रक खाली आहे
Fare Rs 230 for car+driver and 3 passengers

ह्या टप्पा पूर्ण करण्यास आम्हाला फेरी प्रवासासह दीड तास लागला. हा प्रवास आम्ही दोन लेन (Two Lane) च्या अविभाजित रस्त्याने, जो मधे मधे खराब होता आणि कधी कधी अरुंद पण होता, केला, त्या मुळे लागलेला वेळ वाजवीच वाटला.

ह्या टप्प्याच्या मार्गाचा नकाशा असा आहे

ह्या नकाशा जर परखला तर असे लक्षात येते की महाराष्ट्र राज्य महामार्ग 4 (सागरी महामार्ग) जो किनार्या वरून जातो आणि मुख्य राज्य महामार्ग 4 जो नकाशात आतून (inland) जाताना दिसतो त्यांचा प्रवासाचा वेळ सुमारे सारखाच आहे. महाराष्ट्र राज्य महामार्ग 4 ने जाण्याचा फायदा हा आहे की ह्या रस्त्या 22 कि. मी. ने छोटा असल्याने इंधन (Fuel) वाचते आणि किनार्याची साथ, निर्सग सौदर्य आणि फेरीची  (Ferry) सहल हा बोनस आहे.

गुहागर येथे श्री व्याडेश्वर हे प्रसिघ्द व अत्यंत सुरेख शंकराचे आणि श्री दुर्गा देवींची अशी मंदिरे आहेत. इथला समुद्र किनारा पण सुरेख आहे असे म्हणतात पण भर दुपार असल्याने आम्ही तेथे गेलो नही.

टप्पा २ – गुहागर ते वेलास सागरी महामार्गाने.

धोपवे हे पहले ठिकाण जेथे आम्हाला दाभोळ साठी (जे इनरॉन साठी प्रसिध्द आहे पण इनरॉन प्रकल्प खरे तर धोपवे ला आहे दाभोळ ला नाही) चालवून आत – चालवून बाहेर” (Roll On – Roll Off or RORO, कसा वाटला अनुवाद) फेरी बोट पकडण्यास जायचे होते. आम्ही गुहागर येथून 1405 वाजता निघून, गुहागर ते धोपवे 16 कि मी अंतर सागरी महामार्गाने 30 मिनिटात पूर्ण केले. परंतू आम्ही 1435 ला जेट्टी वर पोहोचलो आणि 1430 ची फरी फक्त 5 मिनिटाने चुकली. आता 1515 च्या फेरी ची वाट पहाण्या शिवाय पर्याय नव्हता.

Fare Rs 160 for car+driver and 3 passengers

1515 ची फेरी धरून आम्ही दाभोळला 1525 ला पोहोचलो. इथुन आमचा प्रवास सागरी महामार्गाने सुरू झाला पण काही अंतरानंतर एक फाटा आला जेथे सागरी महामार्ग आणि राज्य महामार्ग 96 वेगळे होतात. तिथे ऐका स्थानिकाच्या सल्लानुसार सागरी महामार्ग खराब असे सांगितल्याने आम्ही दापोली पर्यंत राज्य महामार्ग 96 ने प्रवास केला. दापोली नंतर मुरूड हर्णे होत अंजारले पर्यंत परत सागरी महामार्गाने प्रवास केला. ह्या टप्प्यात दोन्ही रस्ते चागले होते.

तिथून पुढे मुरूडी ला पोहचल्या नंतर मात्र आमचे महा हाल (nightmare) सुरु झाले. तेथून पुढे केळशी पर्यत आम्हाला एक सुंदर पण खराब व अरुंद निनावी रस्ता लागला. केळशी येथे रस्ता नवीन होत असल्याने छान वाटला पण त्या मुळे एके ठिकाणी आम्हाला गल्ली बोळांने जाऊन केळशी – वेलास मुख्य रस्त्याला पोहोचावे लागले जो मागच्या रस्त्या सारखाच खराब होता. ह्या टप्प्याचा नकाशा खाली आहे.


केळशी – वेलास रस्त्यावर प्रवास करत एका पूलाला ओलांडल्या नंतर (जिथे ज्या नदी किनार्याने आम्ही जात होतो तिला ओलांडले) आम्ही एका दोनरस्त्या (Y Junction) जेथे एक वाट डावीकडे व दूसरी सरळ जात होती. गुगल मँप नेव्हीगेटर (Google Map Navigator) च्या सल्ल्यानुसार डावा रस्ता धरला. तो रस्ता किनारी असल्यामुळे आपण ठीकच केले असे वाटले. पण तेथूनच आमचे दु:स्वप्न खालील चित्राप्रमाणे आणखीन भयाण झाले.

केळशी येथून घेतलेला हा अरुंद रस्ता पण नदी किनारीचा (पूर्वी आम्ही दूसर्या किनार्या वर होतो) होता. ह्या रस्त्याची सगळ्यात वाईट बाब म्हणजे त्या वर डांबर जवळ जवळ नव्हतेच. रस्ता बाँक्साइट च्या लाल मातीचा व बैलगाडीच्या चाकाच्या ट्रेकस वाला होता. ह्या रस्त्यावरून दोन कार समोरासमोर एक दूसर्याला पार करू शकत नाहीत.

ह्या रस्त्यावर कार चालवणे (जर ह्या वाटेला रस्ता म्हणता आले तर) म्हणजे कार चालक, वाहन आणि संयमाची परिक्षाच होती. आम्हाला मूर्खात काढल्या सारखे वाटले पण त्यापेक्षाही त्या रस्त्या किनार्यावर रहाणार्या लोकांची कीव जास्त वाटली. आम्हाला वेलास येथे कळले कि नदी वरचा पूल ओलांडल्या नंतर आम्ही डाव्या बाजूची वाट न धरता सरळ वाट धरली असती तर रस्ता जास्त बरा मिळाला असता.

Route Not Recommended - Very Bad Road
शेवटी सुमारे 10 कि मी प्रवासा नंतर साखरी गावापासून वेलास पर्यंत रस्ता थोडा सुधारला. तसे ह्या भागातले रस्ते जरा सुमारेच वाटले कारण गूगल मँप ह्या भागातील सर्व रस्यांवर 17 ते 22 कि मी अंतरासाठी 45 मिनिटे ते 1 तास वेळ दाखवत होता. परंतू साखरी आधीचा रस्ता मात्र खराब रस्त्यांचा जणु राजाच होता. आमच्या मते खाली नकाशात दाखवेला रस्ता जास्त उपयुक्त आहे पण हा रस्ता सागरी महामार्गा किनारचा नाही.

Recommended Route
आम्ही जेव्हा 1830 ला वेलास ला पोहोचलो तोवर कासवपिल्लांना समुद्रात सोडण्याची वेळ (1800) टळून गेली होती पण त्या संध्याकाळी एक पण पिल्लू अंड्यातून जन्मले नव्हते. त्या नंतर आम्ही गावात श्री मोहन उपाघ्ये ह्यांच्या अंगणात वेलास किनार्या वर कासवांच्या पैदाईशी बाबत एक लघुपट (Documentary) पाहिली आणि मग आम्ही तेथून हरिहरेश्वर साठी सुमारे 1930 ला निघालो.

टप्पा III - वेलास - हरिहरेश्वर.

वेलास आणि हरिहरेश्वर मधली वाट (वेसवि – बागमंडला फेरी सह) पुढे नकाशात दाखवी आहे


मागे फेरी बोट साठी जाण्या – येण्याच्या रस्ते अरूंद व खराब आहेत असे लिहेलेले ह्या जागीपण लागू होते.
Fare Rs 160 for car+driver and 3 passengers
आठ वाजता ची फेरी धरून बागमंडला ला उतरून सुमारे 0830 ला आम्ही हरीहरेश्वर ला पोहोचलो. असा हा सागरी महामार्गाचा पहील्या दिवसाचा 10 तासांचा प्रवास पूर्ण झाला.

दिवस II – 06 मार्च 16.

टप्पा I - हरीहरेश्वर - मुरूड जंजीरा

आजच्या प्रवासाच्या आराखड्यानुसार हरीहरेश्वर हून मुरूड जंजीरा (राजापुरी) होत आम्ही रोहा पाली आणि द्रुतगती मार्गाने (Express Way) मुंबई ला लौकर परत पोहोचायचे होते.

पण आपण रेखलेले आणि देवाने ठरलेले ह्यात (सहसा आपल्या भल्यासाठीच) फरक असतो. आमच्या कारचे पुढचे चाक मागील दोन दिवसान पासून तिला मागे घेताना (Reversing) त्रास देत होते. हरीहरेश्वर हून सुमारे 1000 वाजता निघाल्यापासून तो त्रास कार पुढे जात असताना पण सुरु झाला होता. त्या मुळे प्रवास कसा होणार ही काळजी निर्माण झाली. त्या बाबत मी पुढे लिहीन. हरीहरेश्वर हून मुरूड जंजीरा हा नकाशा खाली दाखवला आहे.


कार ला असलेल्या त्रासाला सोडले तर प्रवास सुरळीत झाला. फेरी बोट ला जाण्याच्या वाटेला सोडून बाकी रस्ता छान आणि रुंद होता.

राज्य महामार्ग 99 ने श्रीवर्धन पार केले. श्रीवर्धन ते दिघी जेट्टी हा प्रवास डोंगर, जंगल आणि समुद्र किनार असणार्या सुंदर अश्या श्रीवर्धन – दिघी रस्त्याने बोरलीपाटण मार्गे केला. दिघी फेरी ला (ह्या प्रवासातली शेवट च्या नौकायात्रे साठी) 50 कि मी प्रवास (रस्ता चांगला असून सुद्घा) 1 तास 45 मिनीटांचा प्रवासांतर आम्ही 1145 वाजता पोहोचलो कारण कारला असलेल्या त्रासा मुळे कार मी हळू चालवत होतो.

आता थोडे अगरडंडा फेरी बाबत. बर्याच दिवसांन पासून रोहणी (जे दिघी रस्त्याहून उजवे वळणा नंतर येत) ते अगरडंडा अशी फेरी चालते ज्याचे वेळापत्रक मी खाली देत आहे.


तसेच राजापुरी ते दिघी अशी फक्त प्रवासी फेरी चालते. काही महीन्यांनपासून मात्र दिघी – अगरदांडा अशी दिघी राणी (Dighi Queen) अश्या रसिक नावाची बोट वापरून कार फेरी सुरू झाली आहे. इंटरनेट वर काही मला त्याचे वेळापत्रक मिळाले नाही पण ते फेरी सेवेच्या कार्यालयातून ह्या क्रमांकान वरून घेता येईल 9028223139, 8805635675 आणि 02147227622. कार, चालक आणि तीन प्रवास्यांनसह भाडे 200 रु आहे.

दिघी – अगरदांडा प्रवास 1200 वाजताच्या फेरी ने आम्ही 15 मिनिटात पूर्ण केला आणि पुढे 20 मिनिटाचा प्रवासात राजापुरी (जेथून मुरुड जंजीरा साठी होडी (Boat) मिळते) वाहनतळावर (Parking) पोहोचलो. मी टाटा मोटरस् बरोबर बोललो होतो आणि त्यांचा कारागीर (Mechanic ला हेच म्हणतात ना) इथेच येणार होता त्यामुळे बाकी जण किल्ल्याला गेले पण मला थांबावे लागले.

माझ्या कारचे निरीक्षण करून मँकेनिक ला नेमकी खराबी कळली व त्याने ती दुरूस्ती करावी असा अभिप्राय (Opinion) दिला. तो हे पण म्हणाला कि जर मी हिम्मत करायला (to take the risk) तयार असलो तर कमी  वेग ठेवून (60 कि मी हून कमी) आणि वळणानवर लक्षपूर्वक गाडी चालवल्यास मी मुंबई पर्यत जाऊ शकतो. त्याने असा सल्ला पण दिला की मी रोहा – पाली मार्गे जंगल रस्त्याने जाऊ नये, अलिबाग मार्गे जावे कारण कार चा त्रास वाढल्यास रोहा मार्गवर मदत मिळणे कठीण आहे पण अलिबाग रस्त्यावर मदत सहज मिळेल.

ह्या माहितीने आमच्या सागरी महामार्ग सोडून पर्यायी वाटेने लौकर जाण्याच्या विचाराचा अंत झाला (देव आम्ही हा प्रवास सागरी महामार्गनेच करावा अश्या विचारात असावा असे वाटते). मी हिम्मत करून आपले भाग्य आजमावण्याचे ठरवले त्या मुळे घरच्याच्या किल्ल्याला जावून परत येई पर्यंत वेळ काढण्या शिवाय पर्याय नव्हता. ते सर्व 1500 वाजता परत आले.

टप्पा – II – राजापुरी – काशिद – अलिबाग – वडखल – कोलाबा.

सागरी महामार्गनेच  प्रवास करण्याच्या आमच्या ह्या उद्यमाचा शेवटचा भाग (टप्पा) १५१५ वाजता सुरू झाला. गाव आणि शहरांन मधील काही भाग वगळता रस्ता पूर्ण प्रवासात  छान होता. कार मधे त्रास असून सुद्घा सुमारे 60 कि मी वेगाने कार चालवता येत होती. हा प्रवास आम्हाला सुंदर निर्सगातून (Landscape) घेऊन गेला. वाटेच्या माहितीसाठी खालील नकाश पहा.


ह्या प्रवासात आम्हला छान गती (Speed) मिळाली. काशिद व अलिबाग पार करून आम्ही पोयनाड येथे 1715 ला चहा – पाण्या साठी थांबलो. पोयनाडहून  निघून वडखळ 1850 ला पार करून राष्ट्रीय  महामार्ग 166 अ, राज्य  104 (ज्याला राष्ट्रीय  महामार्ग 348 पण म्हणतात), राष्ट्रीय  महामार्ग 348 अ, पाम बीच रोड, पनवेल – सायन महामार्ग करत आणि शेवटी पूर्वी मुक्त मार्गे आम्ही 2057वाजता (म्हणजे 2100 वाजायच्या आधी) घरी पोहोचलो. त्यात सगळ्यात आनंदाची बाब होती आमच्या कारने त्रास असुन सुध्धा  आम्हाला सुरक्षित घरी आणले होते.

6 comments:

 1. I am going to try this route soon...

  ReplyDelete
 2. Thank you for painstakingly compiling the valuable tips and sharing with us...Please continue and share routes for other enchanting places...

  ReplyDelete
 3. valuable blog, i wish it was in English as well, while allot of things could be understood. But for a wider base, do write again in english.. I wish I had known marathi....

  ReplyDelete
 4. What's more, islamabad is a perfect place for a trip in another place. Islamabad car rent services With great individuals, great sustenance, and incalculable things to attempt, it's an unexpected you haven't booked that islamabad rental auto as of now. Become more acquainted with what this spot is about when you book the perfect auto for your get-away's needs.

  ReplyDelete